सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शैक्षणिक केंद्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पर्यटन नगरी पाचगणी शहरातील शताब्दीचा उंबरठा ओलांडत असलेल्या संजीवन विद्यालयाचा आतंरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक पोहचविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने ‘संजीवन विद्यालय पाचगणी’ या विशेष पाकीटाचे अनावर शनिवारी (दि.१२) केले.
पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षक अपराजिता म्रिधा, संजीवन विद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती शशीताई ठकार, विद्यालयाचे संचालक अनघा देवी,अविनाश अडिघे, एएसपी पुणे पोस्टल डिव्हीजन मोरे,कतृव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ.वेदांतीकाराजे भोसले, पाचगणीच्या नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी कऱ्हाडकर, उमेश त्रिवेदी,वाई सब डिव्हीजन इन्स्पेक्टर शरद वांगकर, नगरसेवक प्रविण बोधे,पाचगणीचे पोस्टमास्तर सचिन सांवत यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन झाले.
अपराजिता म्हणाल्या, पाचगणी येथील संजीवन विद्यालय ही दर्जेदार शिक्षण देणारी निवासी शाळा असून या विद्यालयात देश-विदेशातील विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत.विद्यालय १०० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. हा शताब्दी सोहळा स्मरणीय व्हावा यासाठी भारतीय टपाल विभागाने या विशेष टपाल लिफाफ्याचे अनावर केले आहे.
यावेळी उपस्थितांना विद्यालयाचा गेल्या १०० वर्षांतील विद्यालयाची यशस्वी घोडदौड उलगडून दाखवणारा लघूपट दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी अंतरंगात डोकावणारा टपाला जीवनप्रवास नाटिका सादर केली.
आकांक्षा बोंगाळे व किशोर आरडे यांनी सुत्रसंचलन केले. प्रिन्सिपल क्लॅरिटा डिस्लवा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यालयाचे व्यवस्थापक रविंद्र देशमुख यांनी आभार मानले.