देवेंद्र फडणवीसांचे ट्विट : जिहे- कटापूर प्रकल्पाला केंद्राकडून 247 कोटी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेला म्हणजेच जिहे कठापूर योजना प्रधानमत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या प्रकल्पाला 247 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल ट्विटद्वारे देवेंद्र फडणवीस आणि माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी आभार मानले आहेत.

ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांचा फोटो ट्विट केला आहे. या नेत्यांनी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तर रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी ट्विटमध्ये पाठपुरावा केल्याचे पत्र ट्विट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय?

गुरुवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा (जिहे-कठापूर) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केंद्रीय प्रकल्प म्हणून समावेश केल्याबद्दल तसेच यासाठी 247 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या दुष्काळी भागाला या प्रकल्पाचा मोठा लाभ यामुळे होणार असून, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आमच्याच काळात पूर्ण झाला आणि त्यासाठी संपूर्ण निधी सुद्धा आमच्या सरकारने दिला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Comment