दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘या’ 12 वेबसाईट्सला केंद्र सरकारने केले ब्लॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दहशतवादाविरूद्धची (Terrorism) मोहीम ठामपणे राबवण्यासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व पावले उचलत आहे. या वेळी केंद्र सरकारने खालिस्तान अ‍ॅक्टिव्हिटीजची (Khalistan Activities) जाहिरात करणार्‍या 12 वेबसाइट्स ब्लॉक (Restrictions on Websites) करण्याचे आदेश जारी केले आहेत. यापैकी काही डझनभर वेबसाइट्स सिख फॉर जस्टीस या बेकायदेशीर संघटनेद्वारे (Illegal Organization) थेट चालविल्या जात होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, या वेबसाइट्सवर खलिस्तान समर्थक सामग्री असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कायद्यांतर्गत वेबसाइट केल्या ब्‍लॉक
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) च्या कलम 69 A अंतर्गत या 12 वेबसाइटवर बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय भारतात सायबर स्पेसचे निरीक्षण करण्यासाठी नोडल ऑथोरिटी म्हणून काम करते. सूत्रांच्या माहितीनुसार,pbseva22, seva413, pbteam, pb5911, sfj4farmers.org, Sjf4farmers.uk, pb13, pb99, sewa13, punjabnow आणि sadapind.org या बंदी घातलेल्या वेबसाइट्स मध्ये प्रवेश केल्यास स्क्रीनवर अशी माहिती समोर येते की, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने यास ब्‍लॉक केले आहे. अधिक माहितीसाठी अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा.

केंद्राने एसएफजे संघटनेवर घातली बंदी
देशविरोधी कार्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षी गृह मंत्रालयाने सिख फॉर जस्टिस (Sikh for Justice) संघटनेवर बंदी घातली होती. असा आरोप केला जात आहे की, ही संघटना आपल्या फुटीरतावादी अजेंद्या अंतर्गत शीख जनमत 2020 चा प्रसार करत होती. जुलै 2020 मध्ये केंद्र सरकारने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्‍या या संघटनेशी संबंधित 40 वेबसाइटसवर बंदी घातली होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 8080340221 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा.