हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Central Bank of India : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. याच दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
10 सप्टेंबर 2022 पासून नवीन दर लागू
बँकेच्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, Central Bank of India ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. 10 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत. आता बँकेकडून 60 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर जास्त व्याज दर मिळेल. तसेच बँकेने 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात 10 बेसिस पॉईंट्सने वाढ करून 5.50 टक्के करण्यात आले आहेत.
असे असतील नवीन दर
Central Bank of India आता 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के ,15 ते 30 दिवसांच्या FD वर 2.90 टक्के, 31 ते 45 दिवसांच्या एफडीवर बँक 3 टक्के, 46 ते 59 दिवसांच्या एफडीवर 3.35 टक्के, 60 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के आणि 91 ते 179 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज दिले जाईल.
तसेच Central Bank of India आता 180 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 4.65 टक्के, 271 ते 364 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.45 टक्के, 2 वर्षांहून जास्त आणि 3 वर्षांच्या FD वर 5.50% आणि 3 वर्षे ते 5 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळेल. याशिवाय, बँक 5 वर्षे ते 10 वर्षे FD वर 5.60 टक्के आणि 555 दिवसांच्या एफडीवर 5.55 टक्के व्याज देत राहील.
RBI ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला
अलीकडेच RBI ने रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील 3 पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. Central Bank of India
अनेक बँकांकडून एफडी दरांमध्ये करण्यात आली वाढ
नुकतेच पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, करुड वैश्य बँक, इंडसइंड बँक, ICICI बँक इत्यादींनी देखील त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. Central Bank of India
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.centralbankofindia.co.in/en/interest-rates-on-deposit
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा भरपूर रिटर्न
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजचा भाव पहा
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी मिळेल Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन
Jacqueline Fernandez च्या उत्तराने दिल्ली पोलीस नाराज, आता पुन्हा केली जाणार चौकशी
Bank of Baroda च्या ग्राहकांना आता FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा