गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ दिवशी होणार मतदान

Central Election Commission
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज आकाशवाणी भवनमध्ये पत्रकार परिषद घेत गुजरातमध्ये येत्या 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर निकाल 8 डिसेंबर रोजी लागणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार आता गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गुजरातमध्ये निवडणुकीसाठी राज्यातील 3.24 लाख मतदार पहिल्यांदाच गुजरात विधानसभेसाठी मतदान करणार आहेत. राज्यात 4.6 लाख तरुण मतदार आहेत. तसेच राज्यात 9.89 लाख ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत.

गुजरातमध्ये एकूण 51हजार 782 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात 142 मॉडल पोलिंग केंद्र असणार आहेत. महिलांसाठी 1 हजार 274 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहेत. तर दिव्यांगांसाठी 182 पोलिंग केंद्र तयार करण्यात आले आहे.

असा आहे गुजरात निवडणुकीचा कार्यक्रम

– अर्ज भरण्याची तारीख : 14 नोव्हेंबर

– अर्ज छाननीची तारीख : 15 नोव्हेंबर

– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर

– मतदानाचा पहिला टप्पा : 1 डिसेंबर

– मतदानाचा दुसरा टप्पा : 5 डिसेंबर