हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच या महिन्यात अनेक सण वगैरे असल्याने मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे.
पत्रात म्हंटल आहे की, 19 ऑगस्टपासून 15 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस धोक्याचे आहेत. हे 15 दिवस अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दिवसात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. या कालावधी मध्ये सण, उत्सव लक्षात घेता जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळामध्ये गर्दी जमा होणार नाही. याची दक्षता राज्यांना घ्यावी लागणार आहे.
कोरोना नियमांचे पालन झाले पाहिजे. राज्यांनी स्थानिक स्तरांवर आवश्यक तेवढे निर्बंध लागू करावे. जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होणार नाही. एक छोटीशी चूक देखील संसर्ग पसरण्याचे मोठे कारण ठरू शकणार आहे असे केंद्राने म्हंटल आहे.