नवी दिल्ली : परबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याच्या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र अखेरीस अनिल देशमुख यांनी आज आपला राजीनामा ट्वीटर वरून दिला आहे. याच मुद्द्यावरून राज्यात साध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले असून भाजपने जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवी शंकर प्रसाद यांनी देखील या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, ‘ भाजपाची अपेक्षा आहे की या विषयावरील घोटाळ्याचा निष्पक्ष आणि नीट तपास केला गेला पाहिजे आणि त्यात सामील असलेल्यांना पुढे आणले पाहिजे’.
शरद पावरांवर डागली तोफ
यावेळी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, ‘ शरद पवार देशाचे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत अनिल देशमुख यांना संपूर्ण क्लीनचिट देण्याचे परिणाम त्यांना समजलेच पाहिजेत.’ अशा कडक शब्दात या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी टिप्पणी दिली आहे.
The BJP expects that all the ramifications of this issue ought to be investigated fairly, properly and those involved must be brought to book: Union Minister and BJP leader Ravi Shankar Prasad on #AnilDesmukh pic.twitter.com/3rnDFI6DxW
— ANI (@ANI) April 5, 2021
Sharad Pawar Ji is a senior political leader of the country. He ought to have understood the implications of giving a complete clean chit to Anil Deshmukh: Union Minister and BJP leader Ravi Shankar Prasad
— ANI (@ANI) April 5, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page