हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेची गती वाढवण्यासाठी रेल्वे विभाग मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना दिसत आहे. यामध्ये मुख्यत्वे करून रेल्वे पटरी सुधारण्याचे काम केले जात आहे. त्याच बरोबरीने रेल्वे, रेल्वे पटरीची संख्या वाढवण्यात येत आहे. मध्य रेल्वे मध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे पटरीचे दुहेरीकरण पुर्ण झालेले आहे. तसेच रेल्वेगाड्यांची वाहतूक जास्त असलेल्या ठिकाणी रेल्वेमार्गाचे तिहेरीकरणाचे काम देखील सुरु आहे. यामुळे रेल्वेमार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढणार आहे.
मध्य रेल्वेच्या 399 km रेल्वेमार्गावर स्वयंचलित सिग्नल प्रणाली :
रेल्वेमार्गांवर वाढत्या रेल्वे गाडयांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने ज्या रेल्वे मार्गांवर वाहतूक जास्त असेल अश्या ठिकाणी स्वयंचलित सिग्नल प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या एकूण 399 km रेल्वेमार्गावर स्वयंचलित सिग्नल प्रणाली मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यात आली आहे. यामुळे मुख्यत्वे करून मेल गाडयांना ह्याचा अधिक प्रमाणात फायदा होणार आहे. त्याची प्रवासाची गती वाढून प्रवास अधिक सोईस्कर होणार आहे.
स्वयंचलित सिग्नल प्रणालीचा मोठा हिस्सा मुंबई विभागात:
मध्य रेल्वेच्या मोठ्या हिस्सा स्वयंचलित सिग्नल प्रणालीवर काम करत असून. मध्य रेल्वेने ज्या मार्गांवर स्वयंचलीत सिग्नल प्रणाली स्थापित केली आहे. त्यापैकी 201 किमी मार्ग मुंबई डिवीजन मध्ये आहे. ही यंत्रणा CSMT – कल्याण, CSMT – पनवेल, ठाणे – नेरुळ – खारकोपर, कल्याण – कर्जत, कल्याण – टीटवाळा, दिवा-दातिवली आणि दिवा-पनवेल या मार्गांवर बसवण्यात आली आहे.पुणे – लोणावळा या मार्गावर ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासोबतच भुसावळ मंडलाच्या जळगाव – भुसावळ – बोडवड, नागपुर डिवीजनमध्ये खापरी – नागपुर – गोधनी स्वयंचलित सिग्नल प्रणाली बसवण्याचे काम पुर्ण केले आहे. या सिग्नल प्रणालीमुळे भारतीय रेल्वेचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. आणि त्यामुळे प्रवाश्यांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.