हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 6 डिसेंबर हा भारतीयांच्या आयुष्यातला काळा दिवस मानला जातो. या दिवशी सर्व भारतीयांनी एका महामानवाला गमावले होते. ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांच्या समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लाखो लोक येत असतात. चैत्यभूमी येथे तब्बल 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात. आणि चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. त्यामुळे 6 तारखेला येथे होणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करत मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 12 विशेष गाड्या सोडणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे गाड्यांचा समावेश – Central Railway
महापरिनिर्वाण दिनी होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी व प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) या 12 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भीमानुयायीनचा प्रवास हा सुखकर होईल. याची काळजी घेतली जाणार आहे. मध्य रेल्वे एकूण 12 गाड्या सोडणार आहे. ज्यामध्ये कुर्ला-परळ विशेष कुर्ला, कल्याण-परळ विशेष कल्याण, ठाणे-परळ विशेष ठाणे, परळ-ठाणे विशेष परळ, परळ-कल्याण विशेष परळ, परळ-कुर्ला विशेष परळ, वाशी-कुर्ला विशेष वाशी, पनवेल-कुर्ला विशेष पनवेल, वाशी-कुर्ला विशेष वाशी, कुर्ला-वाशी विशेष कुर्ला, कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला, कुर्ला-वाशी विशेष कुर्ला या गाड्यांचा समावेश आहे.
कसे असेल वेळापत्रक?
कुर्ला-परळ विशेष कुर्ला – 00.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 01.05 वाजता पोहोचेल.
परळ-ठाणे विशेष परळ – 01.15 वाजता निघेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी – 01.30 वाजता निघेल आणि कुर्ला येथे 02.10 वाजता पोहोचेल.
कल्याण-परळ विशेष कल्याण – 01.00 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.15 वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी – 03.10 वाजता निघेल आणि कुर्ला येथे 03.40 वाजता पोहोचेल.
ठाणे-परळ विशेष ठाणे – 02.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.55 वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण विशेष परळ – 02.25 वाजता निघेल व कल्याण येथे 3.40 वाजता पोहोचेल.
परळ-कुर्ला विशेष परळ – 03.05 वाजता निघेल आणि कुर्ला येथे 3.20 वाजता पोहोचेल.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल – पनवेल येथून ही गाडी 01.40 वाजता निघेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचणार आहे.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला – 02.30 वाजता निघेल आणि वाशी येथे ही गाडी 03.00 वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला – ही गाडी 03.00 वाजता निघेल आणि पनवेल येथे 04.00 वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला – ही गाडी कुर्ला येथून 04.00 वाजता सुटेल आणि वाशी येथे 04.35 वाजता पोहोचेल.