हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वेकडून (Central Railways) नेहमी काही ना काही मोठे निर्णय घेतले जातात. त्यामध्ये गर्दी हा सर्वात महत्वाचा भाग असतो. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दीमुळे सर्वच अडचणी निर्माण होत असतात. त्याच गोष्टीचा विचार करून प्रवाश्यांना अधिक सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या गर्दीचा झाला होता. त्यामध्ये गर्दीचा जणू काही लोट उठला आहे असे दाखवले गेले होते. फलटावर असलेल्या स्टॉल आणि गर्दीमुळे प्रवाश्यांना पाय ठेवायला देखील जागा नव्हती. त्यामुळे त्यावर त्वरित पावले उचलली जात आहेत.
निर्णय घेण्याचे काय आहे कारण? Central Railways
दररोज लाखो – करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे स्थानकावर आपल्याला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्याच गर्दीचा अनेकांना त्रास होतो. तर अनेक विविध घटना आपल्याला ऐकायला मिळतात. त्यासाठी मध्य रेल्वे नेहमी सतर्क असते. यावेळी स्थानकावरील स्टॉल हटवण्याचा निर्णय घेण्यात आला कारण, ज्या उपनगरी गाड्या आहेत. त्यामध्ये बिघाड झाल्यास फलटावर मोठी गर्दी होते. आणि या गर्दीतच स्टॉल लागले असल्यामुळे त्याचा प्रचंड मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणून हे हटवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी तसे नियोजन प्रशासन करीत असल्याची माहिती असली तरीही यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. असे मध्य रेल्वेचे (Central Railways) मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले आहे.
सर्वाधिक CSMT स्थानकात असतात प्रवासी
लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामध्ये सर्वाधिक प्रवासी हे सीएसएमटी स्थानकातील आहेत. त्यानंतर पनवेल, ठाणे, कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, कुर्ला, दादर या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे.