हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची संख्याही तेवढीच प्रचंड वाढताना दिसून येत आहे. आणि त्यातच आता दिवाळी आणि छटपूजाही जवळ येत आहेत. तसेच सुट्ट्याचे दिवस सुरु होणार आहेत. साहजिकच गाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने (Central Railways) या निमित्त तब्बल 425 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकही आनंद व्यक्त करत आहेत.
3 लाख प्रवाश्यांना मिळणार दिलासा-
मध्य रेल्वेच्या (Central Railways) या निर्णयामुळे नागपूर, अमरावती आणि कोल्हापूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच मुंबई वरून इतर ठिकाणी जाण्यासाठी लोक रेल्वेचा मार्ग वापरतात. तसेच हा मार्ग लोकांना अत्यंत सोयीस्कर वाटत असल्यामुळे येथील नागरिकांची प्रवासी संख्या अधिक असल्यामुळे तब्बल तीन लाख प्रवाश्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
नियमित गाड्यांचे तिकीट फुल झाल्यामुळे निर्णय घेण्यात आला
रोजच्या सोडल्या जाणाऱ्या गाड्या या नागपूर, मुंबई, बनारस, पाटणा, कोल्हापूर, सोलापूर, दिल्ली – हैद्राबाद, पुणे या गाड्यांचे सर्व सीट आरक्षित असून इतर प्रवाश्यांना गावी जाण्यासाठी गाडी नसल्यामुळे रेल्वेने अधिकच्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या ठिकाणी सोडल्या जातील गाड्या? Central Railways
रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या या विशेष 425 गाड्या कोल्हापूरसाठी 114, नागपूर-अमरावतीसाठी 103, दानापूरसाठी 60, थिविम-मंगळूरसाठी 40, कानपूर-वाराणसी-गोरखपूरसाठी 38, समिस्तीपूर-छापरा-हटियासाठी 36, इंदूरसाठी 18 तर नांदेडसाठी 16 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.