राजेश टोपेची माहिती : कोरोनाबाबत केंद्राचे राज्याला “नवे” निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | राज्यात काही ठराविक जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. आता कोरोना रूग्णसंख्येत वाढ होवू लागली, त्यामुळे केंद्राने एक पत्र दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून मास्क वापरण्याचे आवाहन करत असून सक्ती नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

पुणे येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. केंद्राने दिलेल्या पत्रामध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनाचे पालन करावे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. रेल्वे, बस, सिनेमागृह, रूग्णलाय, शाळा, काॅलेज यासाह सार्वजनिक ठिकाणी मास्क लोकांनी वापरावा. परंतु मास्कसक्ती नाही. पुढील 15 ते 20 दिवसानंतर परिस्थिती पाहून मास्कसक्ती करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.

बंगली डाॅक्टरावर कारवाई सक्तीने करावी 

राज्यात जिथे- जिथे डिग्री नसलेले बंगाली डाॅक्टर आहेत. तेथे ट्रीटमेंट हायर देतात, ग्रामीण भागात असे दिसून येत आहे. डिग्री नसणाऱ्या डाॅक्टरांवर सक्तीने कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे प्रत्येक जिल्ह्यातील एसपींनी आरोग्य खात्याला सहकार्य करावे.

 

 

Leave a Comment