छगन भुजबळ यांना केले रुग्णालयात दाखल

images
images
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याची आज कोर्टात तारीख होती. कोर्टात हजर होण्यासाठी ते घरातून निघाले परंतु त्यांच्या छातीत वेदना निर्माण झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मेहता भुजबळ यांच्यावर उपचार करत असून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने या वेदना निर्माण झाल्या असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. भुजबळांची प्रकृती अधिक ढासळली तर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणावरून त्यांना जमीन मिळाला होता. त्याच खटल्या संदर्भात भुजबळ आज कोर्टात हजर होणार होते.