हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य हे एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ, कुशल राजकारणी आणि तत्वज्ञानी होते. चाणक्यनीतीचे (Chanakya Niti) पालन करून अनेकांनी जगावर राज्य केलं. आचार्य चाणक्य यांनी माणसाला कार्यक्षम जीवन जगण्यासाठी अनेक तत्वे दिली आहेत. चाणक्यांनी आपल्या नीतीत श्रीमंत आणि यशस्वी होण्याचे सूत्र सुद्धा सांगितले आहे. चाणक्यनीती नुसार, व्यक्तीने काही चुका टाळल्या पाहिजेत नाहीतर लक्ष्मीमाता नाराज होईल आणि तुमच्या नशिबात दारिद्र्य येईल. त्यामुळे कोणकोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत याबाबत चाणक्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
वाईट संगत –
वाईट संगतीमुळे आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत आणि संपूर्ण जीवनात त्याचा मोठा फटका बसू शकतो. वाईट संगतीमुळे सुखी जीवन जगणारा माणूसही उद्ध्वस्त होतो. त्याची संपत्ती, सुख, आरोग्य, नातेसंबंध सर्वच बिघडतात. वाईट संगतीमुळे माणूस तो चुकीच्या किंवा अनैतिक गोष्टी करू लागतो. ज्या घरात लोक अनैतिक वागतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही, त्यामुळे श्रीमंत व्हायचं झाल्यास वाईट संगतीचा नाद सोडा.
घाण:
चाणक्यनीतीनुसार, व्यक्तीने आपल्या जीवनात स्वच्छ आणि टापटीपपणे राहील पाहिजे. जिथे स्वछता असते तिथेच लक्ष्मी माता नांदते. त्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल तर घाणीपासून दूर रहा आणि स्वच्छ राहील पाहिजे.
उधळपट्टी-
पैशाची उधळपट्टी केल्याने श्रीमंत माणूसही काही काळाने गरीब होऊ शकतो. त्यामुळे पैसे नेहमी जपून खर्च करावे. जर तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तर चुकीच्या ठिकाणी त्याची उधळपट्टी करण्यापेक्षा गरीब आणि गरजूना दान करा. असं केल्यास लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या आणखी लाभ देईल.