सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून तहसील कार्यालय आवारामध्ये विटयाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा विटा तहसील कार्यालयात आवारात तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये इन्सीडेंट कमांडर म्हणून कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान ७ एप्रिल रोजी महसूल विभागाच पथकाने कराड रस्तवरील रिलान्स पेट्रोलपंपाजवळ दोन वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले होते. दोन्ही डंपरला प्रत्येकी ३ लाख ७१ हजार असा एकूण ७ लाख ७२ हजार रुपांचा दंड ठोठावला होता. दंडाची प्रत पै. चंद्रहार पाटील याला बजावली होती. त्यानंतर १ मे रोजी चंद्रहार पाटील हा तहसील कार्यालयात येऊन तुम्ही मला एवढा दंड का केला? माझा दंड रद्द करा, माझी वाहने सोडून द्या अशी मागणी प्रांताधिकारी शंकर बर्गे यांच्या समोर चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांच्याकडे केली होती.
आज दुपारी तहसीलदार ऋषिकेत शेळके आणि तालुका वैद्यकी अधिकारी डॉ.अनिल लोखंडे हे विटा शहरातील कोरोना पार्श्वभू’ीवर कोव्हीड सेंटरची पाहणी करणसाठी दुपारी दीड वाजणच सुमारास निघाले होते. सरकारी वाहनात बसत असताना तिथे चंद्रहार पाटील हा एका साथीदारासह आला. वाळूच वाहनावर केलेल कारवाईचा रागातून तहसीलदार शेळके यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. त्यामुळे वैद्यकी अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी चंद्रहार पाटील याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मारहाण करत ढकलून दिले. तहसील कार्यालयातच भरदिवसा तहसीलदार आणि वैद्यकी अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर चंद्रहार पाटील हा पसार झाला असून पै. चंद्रहार पाटील याच्यासह अन्य एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”