हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात आहे. आनंद दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीहीशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, धनुष्यबाण गोठवण्यात भाजपचा हात आहे. देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आणि धनुष्यबाण गोठवलं. देशातील सर्व यंत्रणा मोदींनी आपल्या हातात ठेवल्या आहेत. आणि फडणवीस मोदींचे लाडके आहेत. हे जर असच चालणार असेल तर २०२४ ला जनता भाजपला धडा शिकवेल असं खैरेंनी म्हंटल.
शिवसेनेचं नवं चिन्ह कोणतं?? नार्वेकरांचे सूचक ट्विट
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/Elqh5y5LoQ#hellomaharashtra @NarvekarMilind_ @ShivSena
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 9, 2022
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यावर कडक शब्दात घणाघात केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून मोठं पाप केलं आहे. आनंद दिघेंच्या नावाखाली ते हे सगळं करत आहेत पण आज जर दिघे साहेब असते तर शिंदेंना उलट टांगलं असत असा संताप चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला. ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली ते संपले हा इतिहास आहे असा इशाराही त्यांनी दिला.