कीर्तिकरांना म्हातारचाळे लागलेत; ठाकरे गटाची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यांनतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून निशाणा साधला जात आहे. त्याचबाबत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे याना विचारलं असता कीर्तिकरांना म्हातारचाळे लागलेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ नको हे तुम्ही पक्षात राहून बोलायला हवं होत असेही ते म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

गजानन कीर्तिकर हे आमचे मार्गदर्शक होते, त्यांनी आम्हाला घडवलं. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर असणारे कीर्तिकर, ज्यांनी उद्धव ठाकरेंसोबत देखील काम केलं. २ वेळा खासदार, ५ वेळा आमदार राहिलेल्या कीर्तिकरांना पक्षाने इतकं सगळं देऊनही त्यांनी गद्दारांसोबत जाण हे माझ्या मनाला पटलेलं नाही असं चंद्रकांत खैरे म्हणाले. काँग्रेस- राष्ट्रवादीची सोबत नको असं जर ते म्हणत असतील तर त्यांनी यापूर्वी उद्धव ठाकरेंना का सांगितलं नाही. अडीच वर्षांपूर्वीच तुम्ही तस बोलायला हवं होत. आणि तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नकोय मग या गद्दारांसोबत जायच का? असा सवाल करत कीर्तिकरांचे म्हातारपणाची चाळे सुरु आहेत अशी घणाघाती टीका खैरे यांनी केली.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही कीर्तिकर यांच्यावर निशाणा साधला. गजानन कीर्तिकर यांनी पक्ष सोडणं हे धक्कदायक आणि क्लेशदायक आहे असं अंबादास दानवे म्हणाले. गजानन कीर्तिकर हेच यापूर्वी भाजपवर टीका करत होते. भाजप शिवसेनेचा गळा दाबतेय असा आरोप करत होते. आता तेच शिंदे गटात गेले. तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नकोय पण दुसरीकडे गजानन कीर्तिकर अजित पवारांसोबत कुस्ती महासंघात काम करतात. मग हे कसं चालतं? असा सवालही त्यांनी केला.