मनावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यमंत्री केलं; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

0
155
eknath shinde chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले. ते दु:ख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने भाजप आणि शिंदे गटात काही आलबेल नाहीच अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अस मानलं जातं होत मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. त्यानंतर आता काही दिवस उलटत नाही तोच चंद्रकांत पाटील यांच्या या खळबळजनक विधानांनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते किंवा युतीवर काय परिणाम होतो हे सुद्धा पहायला हवं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here