हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप कमी होताना दिसत नाही. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत हे जगातील 182 राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण जगातील विषयांवर मत आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख आहेत. जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख हे संजय राऊत आहेत. एवढ्या वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे, तर संपूर्ण जगातील विषयांवर मत आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय बोलणार, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
बिहार मध्ये सत्ता आल्यास कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपचीच शाखा असून त्यांच्याकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही, अस संजय राऊत म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’