आम्ही मागे लागल्यानंतर मुख्यमंत्री घरातून बाहेर ; आमदार चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
70
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । प्रतिनिधी

आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडले. घरात बसून शेतक-यांना नुकसान भरपाई देता येत नाही. यासाठी बांधावर जावे लागते,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. याशिवाय राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते, असे मत व्यक्त केले. सांगली येथे रविवारी आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील  म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून राज्यातील स्थिती पाहावी, असे आम्ही अनेकदा बोललो. अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या काळात तरी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून शेतीची पाहणी करावी. आम्ही सातत्याने मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर अखेर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत आहेत. आता त्यांनी स्वतःची जबाबदारी झटकून मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. राज्य सरकारने मदतीसाठी केंद्राकडे रितसर मागणी केली आहे का? कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का? याबाबत अजून काहीच काम झालेले नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रोत्तराबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. यात त्यांची काहीच चूक झाली नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी पत्राला उत्तर देताना किमान राज्यपालांच्या वयाचे तरी भान राखायला पाहिजे होते. त्यांनी दिलेले उत्तर योग्य नाही.’ असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here