हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसोबत तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप- शिवसेनेची युती होणार का असा प्रश्न असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला मोठी ऑफर दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची वाघाशी दोस्ती आहेच. उद्धव ठाकरे म्हणातात त्यांचं मोदीजींशी जमतं, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी जमतं नाही. का ते माहीत नाही. पण वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”.
दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडलं असले हे सांगता येणार नाही. वाघाशी दुश्मनी आमची कधीच नव्हती. त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे. फडणवीस आणि पाटलांनी पटत नाही. जर आमच्याशी मैत्री असती तर 18 महिन्यांपूर्वी आमचं सरकार आलं असतं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.