चुकीला माफी नाही; देशमुखांच्या अटकेवर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झालं असून चुकीला माफी नाही अस म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांच्या अटकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी 2014 ला सांगितलं होतं.

दरम्यान, अनिल देशमुख यांची रात्री 12 पर्यंत म्हणजेच तब्बल 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment