महाविकास आघाडी सरकार राज ठाकरेंनाही निश्चितच तुरुंगात डांबेल… ; चंद्रकांत पाटलांचे ट्विट

0
122
Chandrakant Patil Maha Vikas Aghadi Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व महा विकास आघाडीवर आगपाखड केली. त्यांच्या भाषणातील काही विधानांवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सूचक असे ट्विट केले आहे. “हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल,” असे पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना अटक होणार असल्याचे संजल्यानंतर ट्विट करीत महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, बेकायदा भोंग्याच्या आवाजानं होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आक्षेप असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. हे भोंगे काढण्याचे आदेश न्यायालयानेही दिलेत. प्रसंगी न्यायालयाचा अवमान करू, पण हिंदुत्वाची मुस्कटदाबी करूच, अशी भूमिका मविआ सरकार घेईल आणि राज ठाकरेंनांही निश्चितच तुरुंगात डांबेल.

हनुमान चालिसा वाचणं राजद्रोह ठरवणारं मविआ सरकार खासदार-आमदार दाम्पत्याला तुरुंगात डांबण्यासाठी जंग-जंग पछाडतंय. काहीही करून हिंदुत्वाची मुस्कटदाबी करायचीच, हाच या सरकारचा अजेंडा आहे. या परिस्थितीत कोर्टानं आदेश दिलेले भोंगे काढा म्हणणाऱ्या राज ठाकरेंबाबतही वेगळं काय होणार?, असा सवाल पाटील यांनी ट्विटद्वारे केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here