व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

चंद्रकांत पाटलांनी बजावली तरुणीला अब्रुनुकसानीची नोटीस

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापुरातील एका तरुणीला अब्रुनुकसानीचा नोटीस ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बजावली आहे. ‘महायुती’ला कोल्हापूरकरांनी नाकारल्यानंतर ‘कोल्हापूरकर कधी सुधारणार नाहीत’ अशा उल्लेखाची प्रेस नोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांनी जरी सारवा सारव केली असली तरी त्याच्या तीव्र प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटल्या होत्या.

काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या आणि व्यवसायाने वकील असलेल्या कल्याणी माणगावे यांनीही एका व्हिडीओ मार्फत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदवला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटलांनी कल्याणी विरोधात अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. या नोटीसीद्वारे माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका तरुणीला अशा पद्धतीने एका मोठ्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाने बजावलेल्या नोटीसीबद्दल सोशल मीडियात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही याची दखल घेत कल्याणीला आधार दिला आहे. दरम्यान दिवाळी पाडव्याच्या दिवशी कल्याणी यांनी हा व्हिडिओ पोस्ट करून ‘चंद्रकांत दादा तुम्ही सुधारा’ असा सल्ला दिला होता. त्यानंतर हा व्हिडिओ च्या सर्वत्र चर्चा होत होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी अश्या प्रकारे नोटीस बजावल्यामुळे सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली आहे.