संजय राऊतांना अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो; चंद्रकांतदादांचा टोला

raut chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आम्ही सगळे मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू अस विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे. बेळगाव जिंकेल असा राऊत दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकेचाही अभ्यास असू शकतो अशा शब्दांत चंद्रकांतदादांनी टोला लगावला

चंद्रकांत पाटील आज अकोला दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी संजय राऊतांच्या विधानाबाबत त्यांना छेडल असता चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत बेळगाव जिंकेल हा दावा करत असतील तर त्यांचा अमेरिकाचाही अभ्यास असून शकतो. मला तिथली परिस्थिती माहीत नाही, असं पाटील म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले-

बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि आम्ही सगळे मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू आणि पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.