हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज इथे आज भेट घेतली. यावेळी दोघांच्यामध्ये झालेल्या चर्चनंतर प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
मनसेचे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले कि, मनसेकडून भाजपाला युती करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते. मागील काही दिवसात आम्ही दोघे भेटलो आमच्या दोघांच्या भेटीमागे काहीही राजकीय कारण नव्हते. युतीबाबत केंद्रातील आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
आज मनसे प्रमुख मा. श्री. राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि देशातील विविध राजकीय आणि सामाजिक विषयांबाबत सकारात्मक चर्चा झाली. pic.twitter.com/dCkSIJ5fhX
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 6, 2021
चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरे यांनी मला त्यांच्या भाषणाची एक क्लिप मला पाठली होती. ते उत्तर भारतीयांसमोर त्यांनी केलेले भाषण उत्तर प्रदेश बिहारमध्ये खूप व्हायरल झाले होते. ते मी ऐकल्यानंतरही माझ्या मनात काही मुद्दे होते. ते मुद्दे घेऊन आमच्याच चर्चा झाली. दोघांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये भाजप व मनसेच्या युतीबाबत नाही तर एकमेकांच्या भूमिकां संदर्भातील चर्चा झाली.