हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भीम आर्मी चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद हे निवडणूक लढवणार आहेत. गोरखपूर मतदार संघात या दोघांमध्ये जोरदार सामना होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष्य या मतदारसंघात असेल.
चंद्रशेखर आझाद गेल्या काही दिवसांपासून समजावादी पक्षासोबत तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी मागितल्या तेवढ्या जागा देण्यास समाजवादी पार्टी नकार देत आहे. त्यामुळे आता समाजवादी पार्टीने 100 जागा दिल्या तरीही त्यांच्यासोबत युती करणार नाही, अशी भूमिका आझाद समाज पार्टीने घेतली आहे.
यानंतर आता आझाद समाज पार्टीकडून अधिकृतरित्या चंद्रशेखर आझाद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ते गोरखपूर मतदारसंघातून लढतील असंही जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा पारंपारिक मतदारसंघ असून यंदा ते याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.