हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी चंद्रयान 3 चंद्राच्या (Chandrayaan 3) पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले आहे. त्यामुळे कालपासून संपूर्ण भारतात या सुवर्ण क्षणांचा आनंद साजरा करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर लँड झालेल्या चंद्रयान 3 यानाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत यानाच्या बाजूने सोनेरी रंगाचे आवरण लावलेले दिसत आहे. त्यामुळे हे सोनेरी आवरण नक्की काय आहे? आणि ते कशासाठी लावण्यात आले आहे? असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळेच आज आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
मल्टीलेयर इन्सुलेशन- (Chandrayaan 3)
चंद्रयान 3 यानावर लावण्यात आलेल्या सोनेरी आवरणाला MLI म्हणजेच मल्टीलेयर इन्सुलेशन असे म्हणतात. या आवरणाचा रंग आपल्याला बाहेरून सोनेरी दिसत असला तरी तो आतून चंदेरी रंग असतो. यावर अॅल्युमिनियमचा पातळ थर लावण्यात आलेला असतो. यालाच पॉलिमराईड अॅल्युमनाईज्ड शीट असे म्हणले जाते. यानातील रेडिएशन मुळे त्याला कोणती इजा पोचू नये यासाठी मल्टीलेयर इन्सुलेशन वापरण्यात येते. यान नक्की कुठे उतरणार आहे याचे प्रमाण घेऊनच मल्टीलेयर लावण्यात येते. त्यानुसारच, त्याचा वापर केला जातो.
धुलीकणांपासून संरक्षण
मल्टीलेयर इन्सुलेशनच प्रमुख कार्य म्हणजे, यानाच्या (Chandrayaan 3) संवेदनशील भागांचं उष्णतेपासून संरक्षण करणं होय. वातावरणातील बदलाचा यानावावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी मल्टीलेयर इन्सुलेशन लावले जाते. हजारो किलोमीटरचे अंतर पार करून या अवकाशात जाणार असल्यामुळे त्याच्यावर वातावरणातील धुलीकणांचा परिणाम होऊ शकतो. या वातावरणाचा कोणताही परिणाम होऊ नये, तसेच यानाच्या कार्यामध्ये अडथळा येऊ नये यासाठी मल्टीलेयर इन्सुलेशन संरक्षणासाठी वापरण्यात येते. त्यामुळे हे मल्टीलेयर इन्सुलेशन अत्यंत महत्त्वाचे असते.
दरम्यान, चंद्रयान 3 मोहिमेनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर जाणारा भारत पहिला देश ठरला आहे. यापूर्वी 2019 मध्ये चंद्रयान 2 मोहिम राबवण्यात आली होती. मात्र या मोहिमेला यश प्राप्त झाले नाही. मात्र आता चंद्रयान 3 च्या यशानंतर भारताने एक नवा विक्रम रचला आहे. त्यामुळे चंद्रावरील इतर गोष्टींचा शोध घेण्यासाठी भारत आणखीन पुढील मोहिमांसाठी सज्ज झाले आहे.