कराड- पाटण शिक्षक सोसायटीत सत्तांतर : गुरूजन एकता पॅनेलचा 18-3 असा विजय, सत्ताधाऱ्यांचा धुव्वा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. यामध्ये गुरजन एकता पॅनेलने 21 पैकी 18 जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्तांतर घडवून आणले. निवडणूक रिंगणात 19 जागांसाठी तब्बल 68 जण होते. तर ढेबेवाडी गट क्र. 15 मधून शंकर परशुराम मोहिते व मसूर गट क्र. 9 मधून संदीप  रामचंद्र संकपाळ हे दोघेही सत्ताधारी श्री. गुरूमाऊली पॅनेलमधून बिनविरोध निवडूण आले. तर प्रदीप कुंभार हे इतर मागास प्रवर्गात अपक्ष उमेदवार निवडूण आले आहेत.

शिक्षक सोसायटी सर्व उमेदवार, कंसात मते व मतदारसंघ, गाव व मते पुढीलप्रमाणे ः तारळे- चाफळ गट क्रमांक 1 ः विजयी – रामचंद्र रघुनाथ सपकाळ- कडवे खुर्द (1222)- पराभूत- विनायक आप्पासाहेब चव्हाण -चाफळ(248), रमेश एकनाथ जाधव-तारळे (997), कोळे गट क्रमांक 2 ः विजयी- निलम कासम नायकवडी-कोळे(1258), पराभूत- अनिल रामचंद्र पाटील-कोळेवाडी(1163), किशोर विलास पाटील- मंद्रूळ कोळे(19), अमित चंद्रकांत फल्ले-तांबवे (26). उंडाळे गट क्रमांक 3 ः विजयी- दिनेश दिनकर थोरात-ओंड (1800), पराभूत- यशवंत नामदेव कांबळे- उंडाळे (63), प्रदीप महादेव रवलेकर- कोयना वसाहत (249), सर्जेराव तातोबा साठे- सवादे (241). पाटण नंबर 1 गट क्रमांक 4 ःविजयी- सागर परशुराम पाटोळे- सोमवार पेठ- पाटण (1235), पराभूत- प्रकाशराव वामनराव कदम- गणेशनगर (1216), पाटण नंबर 2 गट क्रमांक 5 ःविजयी- आनंदा बाळू चाळके- कोयनानगर(1361), पराभूत- दत्तात्रय सिताराम जगताप- आटवली, पोस्ट- दीक्षित (1108). काले गट क्रमांक 6 ःविजयी- शशिकांत रामचंद्र तोडकर- आगाशिवनगर- मलकापूर (1265), पराभूत- संभाजी राजाराम यादव- काले (1184), दादासाहेब धनाजी शेडगे-शेडगेवाडी- धामणी(20). रेठरे बुद्रुक गट क्रमांक 7 ःविजयी- धनाजी प्रल्हाद कोळी-अहिल्यानगर मलकापूर (1243), पराभूत- सुभाष जगन्नाथ कुंभार- शेरे गांवठाण (1068), सागर रंगराव माने- मुजावर कॉलनी कराड(156). ओगलेवाडी गट क्रमांक 8 ःविजयी- रुक्मिणी मोहन सातपुते- सुर्ली (1302), पराभूत- वैशाली हरिश्चंद्र माने- बनवडी(1152), . मसूर गट क्रमांक 9 ः संदीप रामचंद्र संकपाळ (हेळगाव- बिनविरोध). मल्हार पेठ गट क्रमांक 10 ः विजयी- वनिता बजरंग अपशिंगे- मल्हारपेठ(1256), पराभूत- संभाजी बबनराव भिसे-नाडे (29), रमेश यशवंत महेकर- पालकरवाडी (31), रामचंद्र विष्णू मोरे -मानेवाडी(31), गजानन हनुमंत सुतार-दत्तनगर- मलकापूर(1159)

Karad- Patan teacher Society

उंब्रज गट क्रमांक 11 ःविजयी- संतोष संपतराव यादव-शिरगाव(1276), पराभूत- अनिता सूर्यकांत केसेकर-इंदोली (1157), अरुणा संतोष यादव-शिरगाव (29). सुपने गट क्रमांक 12 ः विजयी-दत्तात्रय दादाराम जाधव -सुपने (1287), पराभूत- संतोष एकनाथ कांबळे-जिजामाता नगर मुंढे (35), संगीता संजय चव्हाण-लाहोटीनगर (13), संजय भिमराव चव्हाण-लाहोटीनगर (1129). तळमावले गट क्रमांक 13 ःविजयी- अंकुश बाबुराव नांगरे-पोतले (1315), पराभूत- अधिकराव रघुनाथ देसाई -कालगाव(1114),  निलेश तानाजी महापुरे-उंब्रज (31). कराड गट क्रमांक 14 ःविजयी- प्रवीण भानुदास मोरे-कुरवली (1218), पराभूत- युवराज गणपती कणसे-अंगापूर (1207), प्रदीप धोंडीराम पाटोळे-सातारारोड(40),. ढेबेवाडी गट क्रमांक 15 ः शंकर परशुराम मोहिते (बिनविरोध).

महिला राखीव मतदार संघ ः- विजयी- वैशाली राजेंद्र पवार- पवारवाडी(1279), पल्लवी हनुमंत यादव- काले(1187), अनुसया दिपक पवार- काले(1184), पराभूत- संगीता संजय चव्हाण-लाहोटी नगर- मलकापूर(15), शोभा दिलीप जाधव-दुशेरे(103), निलम प्रदीप धस-मुंद्रुळकोळे (1109), सुनीता किरण पाटील-टाकळी- शिरोळ(78), मंगल मारुती मोळावडे-नाटोशी(939), अरुणा संतोष यादव-शिरगांव(27), शबाना फैय्याज शिंदे-कार्वे नाका(919).
मतदार संघ – अनुसूचित जाती जमाती ः-विजयी- भारत मारुती देवकांत-आंबेकरनगर(1433), पराभूत- यशवंत नामदेव कांबळे-उंडाळे(10), संजय भिमराव चव्हाण-मलकापूर (13), सागर बाळासो लोंढे-मिरडे- फलटण(987), सर्जेराव तातोबा साठे-सवादे(10), नारायण राजाराम सातपुते-रेठरे बुद्रुक(15).
मतदार संघ- इतर मागास प्रवर्ग ः- विजयी- प्रदीप महादेव कुंभार- कुंभारवाडा- पाटण(1264), पराभूत- राजेंद्रकुमार लक्ष्मण दगडे- भुईंज (1167), कृष्णा चंद्रकांत वाघ-ब्रह्मपुरी मसूर(32).
मतदार संघ- वि. जा. भ. वि. मा. प्र ः- विजयी- महादेव धनाजी दडस -दडसवाडा- येळेवाडी(1284), पराभूत- प्रविण वसंतराव गोसावी-ललगुण (1050), मारुती साहेबराव जाधव-भोसरे(52), दत्तात्रय मारुती ढेकळे-वाखरी(9),  निलम कासम नायकवडी- कोळे(39), मुकुंद रंगराव पन्हाळे-आगाशिवनगर(15), आबा राजाराम शिरतोडे- साकुर्डी(20).

विजयी गुरूजन एकता पॅनेलचे नेतृत्व संभाजीराव थोरात, उदयजी शिंदे, बलवंत पाटील, प्रदिप घाडगे, प्रदिप रवलेकर, बजरंग अपशिंगे, ज्ञानबा ढापरे, दत्ता पाटील, संजय नांगरे, अरूण पाटील, तात्यसो सावंत, तानाजी पाटील, रमेश देसाई, दादासो शेडगे यांनी केले. पराभूत श्री. गुरूमाऊली पॅनेलचा महेंद्र जानुगडे, संयाजी कांबळे, बाजीराव शेटे, संजय शेजवळ, विकास देशमुख, सदाशिव कदम यांनी केले.