हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्व आयकरदात्यांना PAN Card आवश्यक आहे. हे आर्थिक व्यवहारात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. डिजिटल ट्रान्सझॅक्शन असो कि बँक खाते उघडणे असो, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे असो, या प्रत्येक कामासाठी त्याची गरज भासते. याशिवाय बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमध्ये जादा रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी देखील पॅन कार्ड बंधनकारक आहे.
पॅन कार्डमध्ये 10-अंकी परमनंट अकाउंट नंबर (PAN) टाकला जातो. ते अल्फा न्यूमेरिक नंबरमध्ये आहे. जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून जारी केले जातात. सर्व पॅनकार्डचे रेकॉर्ड या विभागाकडे ठेवले जातात.
जर तुमचे PAN Card खूप जुने झाले असेल किंवा तुमचा जुना फोटो असेल किंवा तुमचा फोटो खराब झाला असेल तर आता तुम्ही ते घरबसल्या अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन बदलू शकता.
PAN Card वरील तुमचा फोटो बदलण्यासाठी सर्वांत आधी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटवर, तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा आणि रजिस्टर्ड युझर असे दोन पर्याय दाखवले जातील.
Apply Online वर क्लिक केल्यानंतर सध्याचा पॅनकार्ड बदलण्याचा पर्याय निवडावा लागेल.
यासाठी ‘Correction in existing PAN’ या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर ज्या श्रेणीमध्ये इंडिविजुअल ऑप्शन निवडायचा आहे ती श्रेणी निवडा.
यानंतर स्क्रीनवर विचारलेली माहिती भरा आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.
आता तुम्हाला KYC पर्याय निवडावा लागेल.
ते निवडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर फोटो आणि सिग्नेचर जुळणारे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर फोटो आणि सही बदलायची असेल तर सहीसह पर्याय निवडा.
त्यानंतर तुमच्याकडून विचारले जाणारे तपशील भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर, तुमचा आयडी प्रूफ, फोटो आणि इतर कागदपत्रे विचारली जातील ज्यासाठी सॉफ्ट कॉपी अटॅच करावी लागेल.
यानंतर डिक्लेरेशनवर टिक करा आणि फॉर्म सबमिट करा.
या फॉर्मची प्रिंट आउट घेण्यास विसरू नका कारण आयकर पॅन सर्व्हिस युनिटला एक कॉपी पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि काही दिवसांनी PAN Card मधील फोटो बदलला जाईल.
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर पहा
Share Market : गेले तीन दिवस बाजारामध्ये तेजी का आली ??? तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या
Zomato Share : गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!! तज्ज्ञांचे काय मत आहे ते पहा
LPG Price : 1 जून पासून पुन्हा वाढू शकतात एलपीजीच्या किंमती !!!
कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून सामाजिक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला, कारसुद्धा पेटवली