हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट कोणीही हॅक करू नये, असे तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही व्हाट्सअपवर हे बदल करून घ्या. हॅकर्सने व्हाट्सअपमध्ये ॲक्सेस मिळवण्याचा नवीन प्रकार शोधला आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट झाक डॉफमन यांच्यानुसार, हॅकर्स त्यांच्या डिवाइसमध्ये आपले व्हाट्सअप ओपन करू शकतात.
नवीन मोबाईलमध्ये जेव्हा व्हाट्सअप लॉगिन केले जाते. तेव्हा व्हाट्सअप आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक वेरिफिकेशन कोड पाठवते. आणि जर चुकून हा कोड एखाद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हाती लागला, तर आपले व्हाट्सअप धोक्यामध्ये येऊ शकते. तसेच हॅकर्स आपल्या फोनमध्ये व्हाट्सअपच्या माध्यमातून मालवेअर वायरस पाठवू शकतात. त्यानुसार ते हा कोड मिळवू शकतात. यानंतर आपल्या फोनमध्ये व्हाट्सअप लॉगिन केले जाईल या.
यापासून वाचण्यासाठी व्हाट्सअपमध्ये युजर्सना टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचे एक फीचर दिले जाते. या फिचरमध्ये 6 डीजिट कोड आपल्या मोबाईल मध्ये ठेवला जातो. यामुळे ज्या वेळी नवीन डिवाइस मध्ये व्हॉट्सॲप अकाउंट लॉगिन करतो त्यावेळी कोड विचारला जाऊ शकतो. व्हॉट्सॲप टू- स्टेप- व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह करण्यासाठी, व्हाट्सअप ओपन करा. त्यानंतर सेटिंग्स आणि नंतर अकाउंटमध्ये जा. तेथे वेरिफिकेशन नावाचे विकल्प दिसतील. त्यानंतर लेबल ऑप्शन निवडून आपल्या पसंतीचा एक कोड निवडावा. त्यानंतर आपणाला वेळोवेळी कोड विचारल्यानंतर तो सांगणे गरजेचे आहे. यामुळे आपले व्हॉट्सॲप हॅक होऊ शकणार.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’