धक्कादायक| तंदूर रोटी बनवताना त्यावर थुंकणाऱ्या अचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्ही आत्तापर्यंत फळाला थुंकी लावणारे फळविक्रेते व्हिडिओमध्ये पाहिले असतील, पणीपुरीच्या पाण्यात लघुशंका करणारे पाहिले असतील आणि मध्यंतरी भाजीपाल्यावर थुंकून तो विक्रीला ठेवणारे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लग्नामध्ये बनणाऱ्या स्वयंपाकामध्ये तंदूर रोटी बनवताना आचारी चक्क तंदूर रोटी भाजायला टाकण्यापूर्वी त्यावर थुंकतो आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर सद्ध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

एका लग्नातील स्टेजच्या बाजूलाच ही जेवण बनवण्याची भट्टी सुरू आहे. त्यात हा तरुण चक्क थुंकून रोटी भाजायला टाकतो आहे. संताप आणणारी ही गोष्ट आहे. तश्याच संतप्त प्रतिक्रियाही सोशल मीडियावर येत आहेत. हा व्यक्ती असा का करतो आहे? त्याला रोटीवर थुंकण्याची गरज काय? असेही सवाल विचारले जात आहेत. अद्याप हा व्हिडिओ कुठला आहे याची पुष्टी अजून झालेली नाही.

कोरोनाच्या काळामध्ये संसर्ग होऊ नये म्हणून लोकांना सुरक्षित अंतर पाळण्याचे, तोंडाला मास्क लावण्याचे आणि सारखे हात धुण्याचे आवाहन शासन करत आहे. अश्या वातावरणात असे व्हिडिओ व्हायरल होणे म्हणजे सामाजिक एकात्मतेला धोका निर्माण होणारे आहे. प्रत्येकाने आपल्या सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे अश्या कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’