सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्ती युवक संघाचे संस्थापक ह.भ.प बंडातात्या कराडकर यांना पक्षाघातामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आजही ह.भ.प बंडातात्या कराडकर हे रुग्णालयातच असल्याने त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून सोळशी (ता. कोरेगाव) येथे सलग 12 तास महामृत्युंजय मंत्राचा अखंडपणे जप करण्यात आला.
वारकरी साप्रदयातील एक जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर हे नेहमीच अनेक विधानांनी चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा शासनाच्या विरोधात जावून आंदोलने केली आहेत. व्यसनमुक्तीसाठीही मोठे काम केले आहे. कराड व फलटण येथे गो- शाळा तसेच अध्यात्मिक कार्य सुरू असते. फलटण येथे गेल्या 5-6 दिवसापूर्वी तब्बेत बिघडल्याने रूग्णलायात हलविण्यात आले आहे. अद्याप त्याच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
बंडातात्या कराडकर यांच्या तब्बेत सुधारणा होवून त्याना डिस्जार्च मिळावा, यासाठी शिष्यगणांनी शुळपानेश्र्वर मंदिरात सलग 12 तास महामृत्युंजय मंत्राचा अखंडपणे जप सुरू ठेवला. ह.भ.प बंडातात्या कराडकर हे किर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला पाहिजे म्हणून अथक परिश्रम घेत आहेत. कित्येक युवक ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यामुळे व्यसनमुक्त सुद्धा झाले आहेत.