व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

वरती बघून चाललं तर असंच होतं; तोंडावर पडता पडता वाचली रिया चक्रवर्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण घाई गडबडीत चालताना पायात पाय अडखळून खाली पडतो. असे किस्से आपल्याबरोबर अनेकांसोबत घडतात. अशावेळी मग आपण सावध होत खाली बघून चालू लागतो. असाच किस्सा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रीं रिया चक्रवर्तीसोबत घडला. नेहमीप्रमाणे ती घाईगडबडीत शॉपिंग करण्यासाठी गाडीतून उतरून पायऱ्या चालू लागली तेव्हा ती अडखळून खाली पडता पडता वाचली. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच सोशल मीडियात व्हायरल होत असून नेटकऱ्याकडून तिला ट्रोलही केलं जाऊ लागलं आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही काही ना काही कारणांनी चर्चेत येते. सध्या ती एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. ती म्हणजे तिच्या हटके चालण्याच्या कारणांनी होय. मात्र, घाई गडबडीत चालण्याच्या नादात ती तोंडावर आपटताना वाचलीही आहे. ती अडखळल्यानंतर तिने आपला राग ‘पपा राझीवर काढल्यानंतर तिच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी रियाला चांगलंच सुनावलं आहे. ‘हिला स्वत:ची चूक मान्य करायला नको’ असे म्हणत नेटकऱ्यांनी रियावर निशाणा साधला आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडीओचे आपल्याला पहायला मिळेल कि रिया एका शॉपीमध्ये जात आहे. गाडीतून खाली उतरल्यानंतर ती शॉपीत पायऱ्या चढताना दिसत आहे. तिला पाहताच मीडियाच्या प्रतिनिधी व फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असताना ती घाई गडबडीत पायऱ्या चढताना ती अडखळते आणि तोंडावर पडता पडता वाचते. तिला धडपडताना पाहिल्यानंतर पापाराझी तिला सांभाळून चालण्यास सांगतात. मात्र, रियाने आपला तोल सांभाळत पापाराझीवरच राग काढताना दिसत आहे.

आपली चुकी असताना रियाने दुसऱ्यावर राग काढल्याने तिच्या या वागणुकीमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. रिया स्वत: चालताना धडपडली, मग त्यात पापाराझींचा काय दोष, असा सवाल एका युजरने केला. तर ‘ही दुसऱ्याची चूक कशी काय असू शकते? तिला स्वत:ची चूक मान्य करायची नाही’, असेही एका युझर्सने लिहले आहे.