कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
युवककाँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे आणि शरण पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.
निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5 लाख 48 हजार 267 यांनी नंबर एकची मते मिळाली आहेत. कराड येथील शिवराज मोरे यांनी दुसऱ्या क्रमांकाचे 3 लाख 80 हजार 367 तर तिसऱ्या क्रमांकावर शरण बसवराज पाटील यांना 2 लाख 46 हजार 695 मते मिळाली. या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मुलाखत घेतली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा केली.
https://www.facebook.com/265673710146950/posts/5073338502713756/
या निवडणुकीसाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 ते 12 डिसेंबर 2021 दरम्यान सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली होती.