हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : बुधवारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक स्पष्टीकरण जारी करत म्हंटले की, बँकेच्या खात्यावर आधारित युपीआय पेमेंट किंवा सामान्य युपीआय पेमेंटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आपल्या निवेदनात NPCI ने स्पष्ट केले की, “प्रीपेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI)’ द्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनसाठी मर्चंट इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. मात्र, ग्राहकांना हे शुल्क द्यावे लागणार नाही.
वास्तविक NPCI कडून PPI वॉलेट्सना इंटरचेंज UPI इकोसिस्टीमचा भाग बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच PPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्तीच्या युपीआय ट्रान्सझॅक्शनवर 1.1 टक्के शुल्क आकारण्यात आले आहे. त्यात असेही नमूद केले गेले आहे की, हा इंटरचेंज चार्ज फक्त PPI मर्चंट ट्रान्सझॅक्शनवरच लागू असेल, तसेच ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यावेळी हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, बँक खाते ते बँक खाते आधारित युपीआय पेमेंटसाठीही कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच युपीआय सहीत PPI चे एकत्रीकरण केल्यानंतर ग्राहकांना कोणतेही बँक खाते वापरण्याचा पर्याय उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे यानंतर ग्राहक आणि विक्रेते दोघांसाठीही बँक खाते ते बँक खाते ट्रान्सझॅक्शन मोफत असतील.
NPCI Press Release: UPI is free, fast, secure and seamless
Every month, over 8 billion transactions are processed free for customers and merchants using bank-accounts@EconomicTimes @FinancialXpress @businessline @bsindia @livemint @moneycontrolcom @timesofindia @dilipasbe pic.twitter.com/VpsdUt5u7U— NPCI (@NPCI_NPCI) March 29, 2023
चुकीची बातमी काय होती ???
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स वॉलेट किंवा कार्डद्वारे कोणत्याही ट्रान्सझॅक्शन करण्यावर शुल्क आकारले जाते. मात्र या नवीन परिपत्रकानंतर आता यूपीआय ट्रान्सझॅक्शनवरही हेच शुल्क आकारण्यात येणार आहे. ज्यामुळे 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर 1.1 टक्के इंटरचेंज शुल्क आकारण्यात येणार आहे, असे एका परिपत्रकात सांगण्यात आले.
हे पेमेंट बाहेर असतील
मा तर हे शुल्क फक्त व्यापाऱ्यांना पैसे देणाऱ्या ग्राहकांनाच द्यावे लागेल, असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. ज्यानुसार बँक खाते आणि UPI वॉलेटमधील पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट ट्रान्सझॅक्शनवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही. हे सर्व पेमेंट जुन्या नियमांनुसार केले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
Marriage Certificate बनवणे महत्वाचे का आहे ??? तपासा त्यासाठीची प्रक्रिया
18 मार्च ला फरार झाल्यानंतर अमृतपालचा पहिला Video समोर; म्हणाला की…
Investment Tips : शेअर बाजारातून भरपूर पैसे कमवण्यासाठी फॉलो करा वॉरन बफे यांचे ‘हे’ नियम
आता 2 हजारांहून जास्तीच्या UPI ट्रान्सझॅक्शनवर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
Success Story : बिनकामाची म्हणत ज्या कल्पनेला धुडकावले गेले त्यावरच स्थापन केली 8200 कोटींची कंपनी