हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळेच तो कधीही डिस्चार्ज होऊ नये असे आपल्याला वाटत असते. कारण आपला फोन डिस्चार्ज होण्याने आपली अनेक कामे थांबतात. आजच्या काळात फोन जितका आवश्यक आहे तितकीच त्याची बॅटरीही आहे. मात्र आपला फोन पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देणारे फारच कमी लोकं आहेत. मात्र आपला फोन पुन्हा पुन्हा चार्ज करणे देखील चांगले नाही.
कारण आपला फोन वारंवार चार्जिंगला ठेवणे हे त्याच्या बॅटरीवर वाईट परिणाम करणारे ठरणार आहे. सामान्यतः, कोणत्याही फोनच्या बॅटरीचे (लिथियम-आयन) आयुष्य 2 ते 3 वर्षांचे असते. ज्यात उत्पादकाद्वारे रेट केलेले अंदाजे 300 – 500 चार्ज सायकलसहीत येतात. त्यानंतर, बॅटरीची क्षमता सुमारे 20 टक्क्यांनी कमी होते. Charger
म्हणूनच जर आपण फोन जरासाही डिस्चार्ज झाल्यावर सारखा चार्ज करत असाल तर असे करणे मोठी चूक ठरेल. जेव्हा फोन 500 वेळा चार्ज केला जाईल तेव्हा त्याच्या बॅटरीचे आयुष्य 20% कमी होईल. यामुळे फोनच्या बॅटरीसाठी 40-80 नियम फॉलो करायला हवा.
ऑप्टिमाइझ केलेल्या बॅटरी आयुष्यासाठी, आपला फोन कधीही 40 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. असे म्हणतात की, स्मार्टफोनची बॅटरी 100% पर्यंत चार्ज करणे देखील चांगले नाही. कारण लिथियम-आयन बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्याची शिफारस कधीही केली जात नाही. Charger
या कारणास्तव, बॅटरी लवकर खराब होते: अनेकदा लोकांकडून वेगवेगळ्या चार्जरद्वारे फोन चार्ज केला जातो. मात्र हे कोणत्याही बॅटरीसाठी चांगले नसते. कोणताही फोन हा नेहमी त्याच्या मूळ चार्जरनेच चार्ज करायला हवा. कारण जर आपण वापरत असलेला स्थानिक किंवा इतर कोणाचा चार्जर आपल्या फोनच्या मूळ चार्जरशी जुळत नसेल तर फोनच्या बॅटरीची चार्ज साठवण्याची क्षमता खराब होऊ शकते. Charger
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-accessories/mobile-chargers/pr?sid=tyy%2C4mr%2Ctp2
हे पण वाचा :
No-Cost EMI ची ऑफर पडू शकते महागात, ‘या’ छुप्या शुल्कांमुळे होऊ शकेल मोठे नुकसान
Stock Market मधील अप्पर सर्किट अन् लोअर सर्किट काय असते ??? तपासा याचे नियम
Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ
Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट
SBI खातेधारकांनी पॅन नंबर अपडेट केला नाही तर YONO खाते बंद होणार, तपासा ‘या’ मेसेज मागील सत्यता