December Discount on Cars : सध्या 2023 या वर्षाचे थोडे दिवस उरले आहेत. अशा वेळी आता नवीन वर्ष 2024 सुरु होणार आहे. यामुळे जर तुम्ही या मुहूर्तावर कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या वाहनांचा साठा साफ करण्यासाठी बंपर सूट देत आहेत. 2023 च्या शेवटच्या डिसेंबरमध्ये काही मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. यामध्ये मारुती, ह्युंदाई, एमजी आणि सिट्रोएन सारख्या कंपन्यांच्या कारवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. जाणून घ्या कोणत्या कारवर कंपनी किती डिस्काउंट देत आहे…
मारुती सुझुकी जिमनी
मारुती आपल्या 5 डोअर जिमनीवर 1 लाख रुपयांपर्यंत बंपर सूट देत आहे. महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी ही कार लॉन्च केली जात आहे. यात 1.5 लीटर के सीरीज इंजिन आहे. या कारची सुरुवातीची किंमत 12.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.05 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
Hyundai Grand i10 Nios
Hyundai Grand i10 Nios वर कंपनी 48 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. मात्र कारच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार कारची किंमत बदलू शकते. कंपनीच्या लाइनअपमधील ही स्वस्त कार आहे. या हॅचबॅकची किंमत 5.48 लाख रुपयांपासून ते 8.51 लाख रुपयांपर्यंत आहे. तुमच्यासाठी ही एक परवडणारी कार आहे.
एमजी हेक्टर
ऑटोमोबाईल उत्पादक एमजी हेक्टर मध्यम आकाराच्या एसयूव्हीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय तुम्ही 50 हजार रुपयांच्या इतर ऑफर्सचा लाभ घेऊ शकता. यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे. या कारची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22 लाखांपर्यंत जाते.
Citroen C5 एअरक्रॉस
Citroen C5 Aircross वर तुम्ही तुमचे पैसे 3 लाखांपर्यंत वाचवू शकता. या 5 सीटर एसयूव्हीमध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 36.91 लाख रुपयांपासून सुरू होते.
होंडा सिटी हायब्रीड
कंपनी पहिल्यांदाच या कारवर 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सूट देत आहे. या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल हायब्रिड इंजिन आणि eCVT गिअरबॉक्स आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 18.89 लाख रुपयांपासून सुरू होते. तुमच्यासाठी ही एक शानदार कार आहे.