हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Flight Booking : सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. ज्याचा फटका प्रत्येकाला बसतो आहे. कहाण्या पिण्याच्या वस्तूंपासून ते पेट्रोल-डिझेल पर्यंत अनेक गोष्टी महागल्या आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे आजकाल विमानाने प्रवास करणेही महागले आहे.
अशा परिस्थितीत, जर आपल्याला कमी किंमतीत फ्लाइटची तिकिटे बुक (Flight Booking) करायची असेल तर आज आपण त्याविषयीच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत. याद्वारे आपल्याला तिकिटांवर चांगली सूटही मिळू शकेल. तर कमी पैसे देऊन फ्लाइट कशी बुक करता येईल ते जाणून घ्या…
ऍडव्हान्स बुकिंग करा
प्री-बुकिंग करणे हे केव्हाही चांगले.. याद्वारे पैसे वाचवण्यात मदत होईल. अलीकडील काही सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, 47 दिवस अगोदर तिकीट बुक (Flight Booking) केल्यास कमी भाडे लागू शकेल. तसेच, नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये असेही सुचवण्यात आले आहे की, दुपारची वेळ ही फ्लाइटचे तिकीट बुक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.
Chrome प्लग-इनचा वापर करा
Google Chrome मध्ये काही थर्ड पार्टी प्लग इन मिळतात. जे फ्लाइटच्या भाड्याचे निरीक्षण करतात आणि किंमती कमी असताना नोटिफिकेशन देखील पाठवतात. यामध्ये, आपल्या फ्लाइटच्या भाड्याची तुलना करता येईल आणि ऑनलाइन फ्लाइट बुकिंगमध्ये (Flight Booking) काही प्रमाणात सूट मिळवता येईल.
Google Explorer वापरा
Google Explore वापरून आपल्याला प्रवासाचे योग्य प्लॅनिंग देखील करता येईल. याच्या मदतीने ग्राहकांना हॉटेल्स, फ्लाइट बुकिंग इत्यादींची माहिती मिळते. हे टूल कोणत्या फ्लाइटचे भाडे कमी किंवा जास्त आहे हे देखील दाखवते. या वेबसाइटच्या मदतीने आपल्याला कमी दरात फ्लाइटचे तिकीट बुक (Flight Booking) करता येईल.
बुकिंगसाठी हे दिवस फायदेशीर ठरतील
बहुतेक लोकं शुक्रवार आणि रविवारी प्रवास करतात. तसेच मंगळवार, बुधवार किंवा शनिवार या दिवशी कमीत कमी प्रवास केला जातो. कारण या काळात लोकं आपापल्या कामात व्यस्त असतात. जर आपल्याला पैसे वाचवायचे असतील तर या तीन दिवसांत फ्लाइटचे बुकिंग (Flight Booking) करता येईल. या दिवशी विमान कंपन्यांकडून आपल्या विमानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी तिकिटांच्या किमती कमी केल्या जातात.
ब्राउझरमधून Cookies डिलीट करत राहा
जेव्हा आपण ब्राउझरद्वारे फ्लाइटचे तिकीट सर्च करतो तेव्हा ही माहिती डिजिटल ट्रॅकरमध्ये म्हणजेच कुकीजमध्ये साठवली जाते. यानंतर, जेव्हा आपण पुन्हा तिकीट बुक (Flight Booking) करण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला वाढीव किंमत दिसेल. हे टाळण्यासाठी, ब्राउझिंग केल्यानंतर प्रत्येक वेळा कुकीज डिलीट करायला हव्यात. तसे शक्य असेल नंतर इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च करा. जे कुकीज सेव्ह करणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goindigo.in/flight-booking.html
हे पण वाचा :
Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
IRCTC : ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना जेवणासहित ‘या’ सुविधा मिळतात मोफत !!!
Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!
गेल्या 23 वर्षात ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!
आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या