Cheapest Electric Scooters : ‘या’ आहेत सर्वात स्वस्त Electric Scooters; स्पीड आणि मायलेजही जबरदस्त

Cheapest Electric Scooters
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक (Electric Scooters) वाहनांकडे वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी बाजारात इलेक्ट्रिक गाड्या आणल्या आहेत आणि ग्राहकांची पसंती सुद्धा त्यांना मिळत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला परवडणार अशा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर बाबत माहिती देणार आहोत, चला जाणून घेऊया…

Hero Electric Optima CX

Hero Electric Optima CX-

हिरो कंपनीच्या या Electric Optima CX ची किंमत रु. 62,190 पासून सुरू होते. ही इलेक्ट्रिक स्कुटर एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर 82KM पर्यंत मायलेज देते असा दावा कंपनी कडून केला जातोय. ही (Cheapest Electric Scooters) इलेक्ट्रिक गाडी 51.2V/30Ah बॅटरीसह येत असून ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तासांचा वेळ लागतो. Hero Electric Optima CX चे टॉप स्पीड 45 किमी प्रति तास आहे.

Bounce Infinity E1

Bounce Infinity E1- (Cheapest Electric Scooters) 

ही इलेक्ट्रिक स्कुटर 2 kWh 48V 39 Ah लिथियम-आयन बॅटरीसह येते. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ५ तासांचा कालावधी लागतो. एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही गाडी तब्बल 85km चे मायलेज देते. Bounce Infinity E1 चे टॉप स्पीड 65kmph आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची सुरुवातीची किंमत 45,099 रुपये आहे.

Avon E Scoot

Avon E Scoot-

50 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असलेल्या (Cheapest Electric Scooters) ग्राहकांसाठी एव्हॉनची ई स्कूट इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम पर्याय असू शकते. या गाडीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 45,000 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये 48V/20AH बॅटरी आणि 215W BLDC मोटर मिळते. गाडीची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी जवळपास 8 तास वेळ लागतो. या स्कूटरचा टॉप स्पीड 24KMPH असून एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 65 किमी पर्यंत मायलेज देते असा दावा कंपनीने दावा केला आहे .

हे पण वाचा : 

HOP OXO Electric Bike : या Electric Bike ची डिलिव्हरी सुरु; 150 किमी मायलेज

Electric Bike : 307 किमी मायलेज देणारी Electric Bike लॉन्च; पहा किंमत

लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज

Ola S1 Air : Ola ची सर्वात स्वस्त Electric Scooter लॉन्च; पहा वैशिष्ठ्ये आणि किंमत