हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या प्रेम प्रकरणातून फसवणूक होत असलेल्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रामशाहपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप लावले आहेत. प्रियकर असलेल्या तरुणाने या तरुणीला फक्त नोकरी मिळेपर्यंत जवळ ठेवले आणि ज्यावेळी चांगली नोकरी मिळाली त्यावेळी तिला सोडून दिले. तसेच लग्न करण्याचे वचन देखील निभावले नाही. असे तक्रारदार तरुणीने म्हणले आहे. याप्रकरणी रामशहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता या सर्व घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
इंस्टाग्रामवरून ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामशाहपूर गावात राहणाऱ्या आदित्य नावाच्या तरुणाची प्रतापगड जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणीशी 2021 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर या दोघांमध्ये चांगले संबंध बनले. पुढे यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांच्यामधील बोलणे भेटीगाठी वाढू लागल्या. आदित्यने या तरुणीला लग्नाचे वचन देखील दिले होते. यामुळे त्यांच्यातील शारीरिक जवळीकता देखील वाढली. या काळात आदित्य बेरोजगार असल्यामुळे तो एका चांगल्या नोकरीच्या शोधात होता.
नोकरी मिळताच फसवणूक
आदित्यने आपल्याला नोकरी मिळण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. त्याचवेळी त्याने या तरुणीला अनेक वचने देऊन तिच्याशी संबंध देखील ठेवले होते. मला चांगली नोकरी मिळाली की मी तुझ्याशी लग्न करेल असे आश्वासन आदित्यने तरुणीला दिले होते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून या तरुणीने तुझ्या कुटुंबाला आदित्यच्या घरी पाठवले. मात्र यावेळी आदित्यने लग्न करण्यास साफ नकार दिला. तसेच त्याने तिच्यासोबत बोलणे देखील बंद केले. आदित्यला चांगली नोकरी मिळाल्यामुळे तक्रारदार तरुणी त्याच्या लायक नसल्याचे त्याला वाटू लागले. यामुळे त्याने लग्न करण्यास साफ नकार दिला. थोडक्यात आदित्यला चांगली नोकरी मिळतात त्याने तरुणीची साप फसवणूक केली.
लग्नाचे आमिष दाखविले
तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, तरुणीचे आदित्यवर खरे प्रेम असल्यामुळे लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी तिच्या घरचे आदित्यच्या घरी गेले होते. मुख्य म्हणजे, आदित्यला देखील स्टेट बँकेत नोकरी लागल्यामुळे आता घरचे लग्न लावून देतील असा विचार तरुणीने केला होता. मात्र चांगली नोकरी मिळतात आदित्यने तरुणीसोबत संबंध तोडून टाकले. आता तक्रारदार तरुणीने, लग्नाचे आमिष दाखवून आदित्यने लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप लावला आहे. तसेच आपली त्याच्याकडून फसवणूक झाल्याचे देखील तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या तरुणीने न्यायाची मागणी करत आदित्यवर कारवाई करण्यात यावी अशी विनंती पोलिसांना केली आहे. तर या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.