Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या आयुष्यात आपल्याला काही वैयक्तिक कारणांमुळे पैशांची गरज भासते. यासाठी Personal Loan घेता येऊ शकते. अशा परिस्थितीत, असे लोन घेताना त्यासंबंधित अटी आणि नियमांची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणे महत्त्वाचे आहे. पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्याला कधीही पर्सनल लोन मिळू शकते. चला तर मग आज आपण त्यासंबंधित काही महत्वाच्या गोष्टींची माहिती जाणून घेउयात …

9 benefits of using a Personal Loan to repay debt | IDFC FIRST Bank

Personal Loan घेण्यासाठी आपले वय हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण याद्वारे आपली कर्ज फेडण्याची क्षमता दिसून येते. यासाठी साधारणपणे वय 21 ते 67 वर्षांच्या दरम्यान असावे लागते. तसेच रिटायरमेंटच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीं यासाठी पात्र ठरू शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे कमाईची कमी वर्षे शिल्लक असतात. पर्सनल लोनसाठी आपले राहण्याचे ठिकाण हे देखील महत्त्वाचे घटक आहे.

क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट स्कोअर हे एकमेकांशी संबंधित आहेत. जर आपली क्रेडिट हिस्ट्री चांगली नसेल तर क्रेडिट स्कोअर देखील चांगला नसू शकेल. त्यामुळे हे दोन्ही चांगले असणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घ्या कि, आपला क्रेडिट स्कोअर किमान 750 किंवा त्याहून जास्त असावा. हे लक्षात घ्या कि, काही परिस्थितीत क्रेडिट स्कोअर खराब असला तरीही Personal Loan मिळू शकेल. मात्र त्यासाठीच्या अटी योग्य नसतील.

Top 10 Reasons for Taking Personal Loan in India - moneyview

आपले मासिक उत्पन्नाद्वारे आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड करण्याची क्षमता दिसून येते. बँकेकडून आपल्या शहराच्या आधारे किमान उत्पन्नाचे निकष निर्धारित केले जातात. उदाहरणार्थ, बजाज फिनसर्व्हच्या पर्सनल लोनसाठी पगाराची आवश्यकता किमान 22,000 रुपये. मात्र, ही अट वेगवेगळ्या बँकांसाठी वेगळी असेल.

मासिक उत्पन्नाव्यतिरिक्त, बँकेला तुमच्या निश्चित मासिक खर्चाची देखील माहिती असते. कारण याद्वारे आपल्या Personal Loan ची परतफेड करण्याची क्षमता कळते. तुमचे कर्ज-ते-उत्पन्न प्रमाण 50% पेक्षा जास्त असेल तर आपला अर्ज नाकारला जाऊ शकेल. कर्ज-ते-उत्पन्न प्रमाण 40% वर ठेवण्याची शिफारस केली जाते.

From wellness to travel, take loan for any purpose

सर्वसाधारणपणे, सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या Personal Loan साठीच्या अटी आणि नियम सारखेच असतात, त्यामुळे या नियमांचे पालन केल्यास कर्ज सहजपणे मंजूर होईल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bankbazaar.com/personal-loan.html

हे पण वाचा :

‘या’ Multibagger Stock ने गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस !!!

Divi’s Laboratories Limited च्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश

LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या

FD Rates : ‘या’ बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर दिले जाते 7.50% पर्यंत व्याज