छ. उदयनराजे यांचा खळबळजनक आरोप : मुख्यमंत्र्यांची मोदीशी भेट राजकीय तडजोडीसाठी अन् सत्तांतर होण्यासाठी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट दिल्लीमध्ये जाऊन घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची आजची भेट ही केवळ राजकीय तडजोडीसाठी असून राजकीय घेवाण देवाणी मधून सत्तांतर होण्यासाठीच असल्याचा खळबळजनक आरोप देखील खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते. सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर खा. छ. उदयनराजे भोसले यांनी बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री व पंतप्रधान भेटीबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना माध्यमांनी गाठून प्रतिक्रिया विचारली.

खा. उदयनराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलावणे आणि त्या अधिवेशनात चर्चा होणे गरजेचे होते ते का झाले नाही ? आपण पुन्हा एकत्र येवूया आणि समाजाला शांत करूया. मला आता अंदाज बाधता येईनात. कोणी आत येत आहे तर कोणी बाहेर पडत असून एक डाव भुताचा चाललेला आहे.

You might also like