हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आणि राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली होती. आज त्यांचे रिपोर्ट आले असून यामध्ये छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.
कालच येवल्यावरून परत येत असताना अचानक छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होत. त्यांनतर तातडीने त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केल्यांनतर आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी सुद्धा छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि H3N2च्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. खास करून मुंबई, पुणे आणि संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या शहरात रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे.