हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या (ISIS) गळाला लागले आहेत. 15 फेब्रुवारी 2024 रोजी संभाजीनगर मधील बेरीबाग परिसरातून एनआयएने 35 वर्षीय मोहंमद जोएव खानला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध शुक्रवारी मुंबईतील एनआयएच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोप पत्रातून छत्रपती संभाजीनगरमध्ये पसरलेल्या एनआयएच्या जाळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मोहम्मद झोएब खान स्लीपर सेल म्हणून काम करत होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये इसिसचे जाळे पसरवण्याचे काम त्याने केले. देशातील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी तरुणांची मोठी टोळी तयार करण्यात आली होती. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कि येथे पळून जाण्याचा कट रचण्यात आला होता. लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजीनगरातील जोएब त्या कटाचे मुख्य सूत्रधार होते, असे या दोषारोपपत्रात म्हटले आहे. मोहम्मद झोएबच्या मदतीने मराठवाड्यातील आणि राज्यातील 50 जणांची एक टोळी तयार करण्यात आली होती.
जोएब हा अगोदर बंगळुरुमध्ये नोकरी करत होता. त्यानंतर त्यानं वर्क फ्रॉम होम घेऊन छत्रपती संभाजीनगरात इसीसचं जाळं पसरवण्याचं काम सुरू केलं, असंही या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. मोहम्मद झोएब ने 50 तरुणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या माध्यमातून विविध ठिकाण हल्ला करण्यासाठी स्फोटकांची निर्मिती करण्याचे प्रशिक्षण तो तरुणांना देत होता. महत्वाची बाब म्हणजे जोएबला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी शहरात 9 ठिकाणी छापे टाकले. सर्व एजन्सींचे तपास कार्य अजूनही सुरु आहे.