हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार असून ते नुकतेच औरंगाबाद येथे दाखल झाले. या ठिकाणी येताच त्यांनी ड्रग्ज कारवाईवरुन महत्वाचे विधान केले. जगभरातील ड्रग्ज महाराष्ट्रातच सापडत आहे असे एकप्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. ज्यावेळी मुंबई पोलिसांनी 25 कोटीचे हेरॉईन जप्त केले. त्यावेळी त्यांचे कुठेही नाव आले नाही. महाराष्ट्र व महाराष्ट्रातील पोलिसांचे नाव बदनाम प्रयत्न करण्याचा पर्यत केला जात आहे. तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला.
मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणात सध्या कारवाई केली जात आहे. या प्रकरणात कारवाई करून महाराष्ट्रातच ड्रग्ज सापडत असल्याचे दाखविले जात आहे. त्यातून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव केला जात आहे. जगभरातील ड्रग्ज महाराष्ट्रातच सापडते, असे दाखविले जात आहे. अशा प्रकारचे काम एक विशिष्ट टीम करू शकत नाही. यातून राज्य सरकारचीही जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून आज औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.