हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास जाणवू लागला असल्याने त्यांच्यावर डॉक्तरांकडून उपचार केले जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून त्यांना हा त्रास होत आहे. दरम्यान ते पुन्हा थोड्यावेळातच उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांच्यावर छोटी शत्रक्रिया होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या आठवडाभरापूर्वी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी काही शारीरिक चाचण्याही केल्या होत्या. दरम्यान त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर जाण्याचे टाळत घरातून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ते सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावत आहेत. दरम्यान आजही कॅबिनेटच्या बैठकीला त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी उपस्थिती लावली. सध्या ठाकरे यांचा हा त्रास कमी होत नसल्याने ते पुढील उपचारासाठी आज रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. दरम्यान ते थोड्या वेळातच रुग्णालयात दाखल होणार आहेत.