चिखलठाण ते वाळूज अखंड उड्डाण पुलाला मिळणार गती !

karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित असा औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव हळू हळू पुढे पडत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळलाने नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूजपर्यंत अखंड पूल, नगर नाका-माळीवाडा ते वेरूळ या रस्त्याचे रुंदीकरण, औरंगाबाद-वैजापूर-शिर्डी मार्ग चौपदरीकरणाच्या मागण्यांचे निवेदन गडकरींना दिले.

डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथील शिष्टमंडळाने इतरही रस्ते विकास कामांचे प्रस्ताव नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवले. या शिष्टमंडळात वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, उद्योजक राम भोगले यांचा समावेश होता.

कराडांनी पुढील विकासकामांचे निवेदन दिले.-
– नगरनाका- माळीवाडा-दौलताबाद टी पॉइंट ते थेट वेरूळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कारण सध्याचा रस्ता अरुंद असल्यामुळे इथे अपघातांची मालिकाच सुरु आहे. तसेच माळीवाड्यापर्यंत शहराचा विस्तार झाल्यामुळे तेथेही नागरिकांची वर्दळ असते. म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.
– औरंगाबाद-वैजापूर- शिर्डी या मार्गाचेदेखील चौपदीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असल्याने तसेच शिर्डी देखील राष्ट्रीय पातळीवरचे धार्मिक स्थळ असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे भाविकांना सध्याचा दुपदरी रस्ता कमी पडतो. या रस्त्याचेही रुंदीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.