सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कास रस्त्यावरील यवतेश्वर येथे बंधाऱ्यामध्ये मुलाचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषिकेश राजाराम कार्वे (वय १५, रा. यवतेश्वर ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सदरची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. ऋषिकेश रविवारी मित्रांसोबत डोंगरावर फिरायला गेला होता. गेल्या आठ दिवसांमध्ये परिसरात पाऊस झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणी साठले होते. पोहण्यासाठी या गेल्यानंतर तो बुडाला. त्याला मित्रांनी बाहेर काढले व तात्काळ उपचारासाठी सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचार केले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती कार्वे कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृत्यू. झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.