पालघर प्रतिनिधी । नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की नालासोपारा पूर्वेकडील वलई पाडा येथे राहणारा १७ वर्षीय मतिमंद मुलगा हा इमारतीच्या आवारात खेळत होता. तेवढयात या इमारतीत रहाणाऱ्या नितीन शिंदे या इसमाने या मतिमंद मुलाला इमारतीच्या छतावर नेवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करू केला. यावेळी मुलाने ओरडायला सुरुवात केली. तेव्हा या आरोपीने त्याचे तोंड दाबून ठेवले आणि त्याच्यावर अत्याचार केला.
याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गिरकर करीत आहेत.